
भारतभरातील गरीब व वंचित नागरिकांना मोठ्या आरोग्य सेवांसाठी आर्थिक संरक्षण देणे, त्यांना मोफत उपचार उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सेवांमध्ये समता निर्माण करणे.
* आयुष्यमान भारत योजना -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)
आयुष्यमान भारत योजना :
आर्थिक मागास व दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. गरिबांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
वैशिष्टे :
1) प्रत्येक कुटुंबासाठी रु. 5 लाखापर्यंत प्रति वर्ष विमा संरक्षण
2) प्रायव्हेट / सरकारी हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सुविधा
3) योजनेबाबत वयाची अट नाही.
योजना कोणासाठी :
आयुष्यमान भारत व योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात येत आहे.
कोणत्या सुविधा :
योजनेअंतर्गत 34 विशेषज्ञ सेवांतर्गत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 996 उपचार व शस्त्रक्रिया सेवांचा समावेश आहे. तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 1209 उपचार सेवांचा समावेश आहे. यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात येत आहेत. तर 328 मागणी असलेल्या नवीन उपचारांचा समावेश करण्यात येत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये एकूण उपचार संख्येत 147 ने वाढ होऊन उपचार संख्या 1356 एवढी करण्यात येत आहे व 1356 एवढेच उपचार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील उपचार संख्या 360 ने वाढविण्यात येत आहे. सदर 1356 उपचारांपैकी 119 उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव राहतील.
एकत्रित योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शरवक्रिया, रवी रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतळ्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्यांच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, एनडोक्रोईन, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडिओलॉजी उपचार यांचा लाभ होतो.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतरचा खर्च, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा वैद्यकीय तपासणीस आल्यास मोफत उपचार, नवजात बालकांवर उपचारांसह अन्य सेवांचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. रुग्णांना कॅशलेस आणि पेपरलेस सुविधा मिळेल.
प्रती वर्ष आर्थिक मर्यादा :
सध्या आयुष्यमान भारंत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (PMJAY) आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. 5 लक्ष एवढे आहे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत (MJPJAY) आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. 1.5 लक्ष एवढे आहे. आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतर्गतही आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. 5 लक्ष एवढे करण्यात येत आहे.
सध्या मुत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये उपचार खर्च मर्यादा प्रति रुग्ण रु. 2.5 लक्ष एवढी आहे, ती आता रु. 4.5 लक्ष एवढी करण्यात येत आहे.
प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लक्ष पर्यंत विमा संरक्षण मिळते. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल.
Website : https://beneficiary.nha.gov.in/
कागदपत्रे :
1) आधार कार्ड
2) रेशनकार्ड (नवीन 12 अंकी RC नंबर आवश्यक)
Leave a Comment