
राष्ट्रीय अप्रसारित आजार (NCD) पोर्टलवर ABHA कार्ड लिंक केल्याने तुमचे वैद्यकीय रेकॉर्ड अधिक सुलभ आणि सुरक्षित पद्धतीने व्यवस्थापित करता येतात
आभा कार्ड हे NCD पोर्टलला लिंक
आभा कार्ड (ABHA Card – Ayushman Bharat Health Account) :
हे भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत सुरु करण्यात आलेले एक वैयक्तिक डिजिटल हेल्थ आयडी आहे. हे कार्ड तुम्हाला तुमचे वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवण्यास व ते अधिकृत आरोग्य सेवांशी शेअर करण्यास मदत करते.
NCD पोर्टल (Non-Communicable Diseases Portal)
हा भारत सरकारचा एक आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म आहे, जो मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान व व्यवस्थापनासाठी वापरला जातो. ABHA कार्ड हे NCD पोर्टलशी लिंक केल्यास, या रुग्णांच्या तपासण्या व उपचारांचे डिजिटल रेकॉर्ड एकत्रित व अखंड राहतात.
उद्देश :
1) रुग्णांचे आरोग्य रेकॉर्ड एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात ठेवणे.
2) तपासणी, निदान व उपचारामधील सातत्य व पारदर्शकता ठेवणे.
3) विविध आरोग्य केंद्रांमध्ये गेल्यावरही एकसंध रेकॉर्ड उपलब्ध ठेवणे.
4) आरोग्य सेवा अधिक जलद, सुरक्षित व कार्यक्षम करणे.
कोणासाठी :
1) सर्व व्यक्तींसाठी, विशेषत ज्यांना NCD (जसे मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग) यांचा धोका आहे.
2) गावपातळीपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत तपासणीस येणारे नागरिक.
3) आरोग्य कर्मचाऱ्यांनी यासाठी लोकांची नोंदणी करून त्यांचे ABHA कार्ड तयार करणे गरजेचे असते.
कागदपत्रे :
ABHA कार्ड तयार करताना आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे :
1) आधार कार्ड (Aadhaar Card) – सर्वात महत्त्वाचे (मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
2) मोबाईल नंबर – ओटीपी साठी
NCD पोर्टलवर ABHA कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया:
1) NCD पोर्टल वर लॉगिन करा.
2) लाभार्थ्याची नोंदणी करताना “ABHA ID” (Health ID) तयार करा किंवा आधीची ID लिंक करा.
3) आधार ओटीपीद्वारे प्रमाणीकरण करा.
4) एकदा ABHA कार्ड तयार झाल्यावर, ते त्या व्यक्तीच्या डिजिटल आरोग्य प्रोफाईलशी लिंक होते.
5) भविष्यातील तपासण्या, निदान व औषधे यांचा रेकॉर्ड त्यावर सेव्ह केला जातो.
ABHA कार्ड NCD पोर्टलला लिंक सरकारी आरोग्य यंत्रणा अंतर्गत कार्यरत कर्मचारी हे काम करतात
1) ANM (Auxiliary Nurse Midwife) / ASHA वर्कर / CHO (Community Health Officer) :
गाव किंवा आरोग्य उपकेंद्र पातळीवर आरोग्य तपासणी करताना NCD पोर्टलवर व्यक्तीची नोंदणी करतात. नोंदणी दरम्यान ABHA कार्ड तयार करतात किंवा आधीचं कार्ड लिंक करतात.
2) PHC / Sub-Center / Health & Wellness Center (HWC) मध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी :
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करताना NCD पोर्टलवर रुग्णाची माहिती भरतात. ABHA ID लिंक करून तपासणीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करतात.
3) डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) / ICTC Counselor (जिथे उपलब्ध):
काही जिल्हा / तालुका रुग्णालयांमध्ये नोंदणी व रेकॉर्ड तयार करण्याचं काम हे कर्मचाऱ्यांकडून केलं जातं. ते ABHA कार्ड NCD पोर्टलशी लिंक करतात.
Leave a Comment