
रस्त्यावर व्यापार करणाऱ्या फेरीवाल्यांना व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी व तो वाढवण्यासाठी आर्थिक मदत.
PM SVANidhi – पीएम स्वनिधी योजना (स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना) :
रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना अनुदानित व्याजदरावर भांडवली कर्ज दिले जाते. सर्व प्रकारचे विक्री व सेवा व्यवसाय (फळबाजारे, भाजीपाला, स्ट्रीट फूड, असुरक्षित वस्तू, कपडे, दुकान, हेअरकट इत्यादी) या योजनेचा लाभ घेऊ शकतात. परतफेड वेळेवर केल्यास व्याज अनुदान आणि क्रेडिट स्कोअर वाढवण्याचे लाभ मिळतात.
योजना कोणासाठी :
शहरी आणि उप-शहरी भागातील फेरीवाले / स्ट्रीट वेंडर्स.
योजनेची वैशिष्ट्ये :
1) पहिल्या टप्प्यात Rs. 15,000/- पर्यंतचे तात्काळ कर्ज.
2) दुसऱ्या टप्प्यात (लोन रिपेमेंट चांगले असल्यास) Rs. 25,000/- पर्यंतचे कर्ज.
3) तिसऱ्या टप्प्यात Rs. 50,000/- पर्यंतचे कर्ज.
4) कर्जाच्या वेळेवर परतफेडीवर 7% वार्षिक व्याज अनुदान. अनुदान थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होते.
5) डिजिटल व्यवहार केल्यास Cashback Rs. 50 ते Rs.100 प्रति महिना.
6) कर्जासाठी कोणतीही जामीनदाराची आवश्यकता नाही (Collateral Free Loan).
7) व्यवसाय वाढवण्यासाठी Working Capital Loan उपलब्ध.
अत्यावश्यक कागदपत्रे :
1) आधार कार्ड
2) पॅनकार्ड
3) रेशनकार्ड
4) बँक पासबुक 5) फेरीवाला प्रमाणपत्र / स्ट्रीट वेंडर ID (असल्यास)
Leave a Comment