ही महिलांसाठी विशेषतः त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरु करण्यात आलेली एक उपक्रम आहे.
पिंक रिक्षा योजना – महाराष्ट्र (Pink Rickshaw Yojana Maharashtra)
योजनेचा उद्देश (Objective of the Scheme):
पिंक रिक्षा योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केली आहे. यामध्ये महिलांना रिक्षा चालवण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांना स्वावलंबी बनवणे, सुरक्षित रोजगार उपलब्ध करणे आणि महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी पर्याय उपलब्ध करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
योजना कोणासाठी :
ही योजना फक्त महिलांसाठी आहे. मुख्यत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (वार्षिक कुटुंब उत्पन्न 3 लाखा खालील) 18 ते 45 वयोगटातील महिला, विधवा, घटस्फोटित किंवा एकट्या राहणाऱ्या महिला, ज्यांना वाहन चालवण्याचा अनुभव आहे किंवा प्रशिक्षण घ्यायची तयारी आहे. ज्यांना स्वत:ची रिक्षा चालवायची आहे.
योजनेचे वैशिष्ट्ये :
1) महिलांसाठी खास पिंक रंगाच्या रिक्षा उपलब्ध करून दिल्या जातात.
2) प्रशिक्षण (ड्रायव्हिंग + मुळभूत देखभाल) दिले जाते.
3) अनुदान किंवा कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध.
4) सुरक्षेच्या दृष्टीने जीपीएस आणि पॅनिक बटणसुद्धा रिक्षांमध्ये दिले जातात.
5) महिलांना व्यवसायिक वाहन परवाना मिळवण्यासाठी मदत केली जाते.
आर्थिक मदत : एकूण किमतीचे वितरण
10% — महिला स्वतः भरतील
20% — राज्य सरकार अनुदान
70% — बँकेतून कमी व्याजदराने कर्ज (ह्या कर्जाची वापर अवधि = 5 वर्षे)
आवश्यक कागदपत्रे (Required Documents) :
1) आधार कार्ड
2) पॅन कार्ड
3) राशन कार्ड
4) पासपोर्ट साइज फोटो
5) वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
6) शैक्षणिक प्रमाणपत्र (जर आवश्यक असेल तर)
7) बँक पासबुक / बँक खाते तपशील
8) ड्रायव्हिंग लायसन्स (Learner’s किंवा परवाना मिळवण्यासाठी तयारी असल्यास ते दर्शविणारे पुरावे)
9) स्वघोषणा पत्र (की आपण ही रिक्षा व्यवसायासाठी चालवणार आहात)
अतिरिक्त माहिती :
ही योजना विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जाते. काही शहरांमध्ये ही योजना खासगी संस्था किंवा CSR प्रकल्पांतर्गत देखील राबवली जात आहे.
अर्ज कसा करावा :
जवळच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयात संपर्क साधा.

Leave a Comment