शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक सहाय्य पुरवणे व त्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करणे.

पंतप्रधान किसान सन्मान योजना (PM-KISAN)
ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे जी शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देते. दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत मिळते. ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये (₹2,000 प्रत्येक) थेट बँक खात्यात पाठवली जाते. योजनेत सहभागी होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.
योजना कोणासाठी :
ही योजना लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे, शेत जमीन धारक.
पात्रता:
1) शेतकऱ्यांच्या नावावर शेतीसाठी जमीन असणे आवश्यक आहे.
2) शेतकऱ्याचे नाव 7/12 उताऱ्यावर नोंदलेले असावे.
3) शेतकरी भारतीय नागरिक असावा.
अत्यावश्यक कागदपत्रे:
1) आधार कार्ड
2) 7/12 उतारा (भूमीचा पुरावा)
3) बँक पासबुक (बँक खात्याचा तपशील)
4) मोबाइल नंबर
5) ओळखपत्र (पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र इ.)
Leave a Comment