Responsive Search Bar

Govt. Jobs

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी (Chief Minister’s Relief Fund)

Job Details

Salary :

Post Name :

Qualification :

Age Limit :

Exam Date :

Last Date :

Apply Now

गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर व खर्चिक आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, जेणेकरून पैशाअभावी कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी (Chief Minister’s Relief Fund)

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी (Chief Minister’s Medical Assistance Fund) :

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ही महाराष्ट्र शासनामार्फत चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे, जी अत्यंत गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना अत्यवस्थ किंवा जीवनघातक आजारांवर उपचारासाठी आर्थिक मदत पुरवते.

योजनेचा उद्देश :

आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गरजू नागरिकांना गंभीर आणि महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य पुरवणे. जीवनाश्यक उपचार जसे की कॅन्सर, हृदयविकार, किडनी ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, ब्रेन ट्युमर इ. आजारांसाठी मदत देणे.

योजना कोणासाठी :

1) अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.

2) अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात (BPL / अल्प उत्पन्न) असावा.

3) सरकारी / मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात उपचार सुरू असावा किंवा होणार असावा.

4) संबंधित आजार गंभीर स्वरूपाचा असावा

अर्ज कसा करावा (Application Process):

1) ऑनलाइन अर्ज : महाराष्ट्र शासनाच्या https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येतो. तिथे “वैद्यकीय मदत” विभागात जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा.

2) ऑफलाइन अर्ज : मुख्यमंत्री कार्यालय, मंत्रालय, मुंबई येथे अर्ज पाठवता येतो.  अर्ज पोस्टाने किंवा प्रत्यक्ष जाऊन दिला जाऊ शकतो.

टीप : अर्ज सादर केल्यानंतर त्याचा स्क्रूटनी व मेडिकल बोर्डमार्फत परीक्षण होते. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास आणि अर्ज मान्य झाल्यास रुग्णालयाच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाते. मदतीची रक्कम रूग्णाच्या आजाराच्या स्वरूपावर व आर्थिक स्थितीवर अवलंबून असते.

मदत / संपर्कासाठी :

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, मंत्रालय, मुंबई-400032

दूरध्वनी : 022-22025151 / 22026454

संकेतस्थळ : https://cmrf.maharashtra.gov.in

आवश्यक कागदपत्रे :

1) अर्जपत्र – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी निर्धारित नमुन्यातील अर्ज.

2) रुग्णाचा वैद्यकीय अहवाल – संबंधित डॉक्टर / रुग्णालयाकडून तपशीलवार रिपोर्ट (diagnosis, treatment plan इ.)

3) उपचार खर्चाचा अंदाजपत्रक (estimate) – रुग्णालयाकडून अधिकृत लेटरहेडवर दिलेले.

4) रुग्णाचे ओळखपत्र – आधार कार्ड

5) पत्त्याचा पुरावा – रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (उदा. राशन कार्ड, मतदार कार्ड, विजेचा बिल इ.)

6) उत्पन्नाचा पुरावा – तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र.

7) बँक पासबुकची झेरॉक्स – रुग्णाच्या किंवा नातलगाच्या नावाने चालू असलेले खाते.

8) पासपोर्ट साईज फोटो –  रुग्णाचे.

9) रुग्णालयाचे नोंदणी प्रमाणपत्र (रुग्णालय खासगी असल्यास).

10)  इतर संबंधित प्रमाणपत्रे –  गरजेनुसार.

Apply Now Link

Note: The link above will take you to the job application. Copy the link and open it in a new tab. Best of luck!

For more job updates, please join our WhatsApp and Telegram channels. We update new jobs daily. Also, please share this post with your relatives and friends to help them try for this job. Sharing is caring.

About Us

Stay informed about the latest government job updates with our Sarkari Job Update website. We provide timely and accurate information on upcoming government job vacancies, application deadlines, exam schedules, and more.

Follow Us

Subscribe For New Job Updates