महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची आरोग्यविषयक योजना आहे, जी राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार प्रदान करते.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJP-JAY)
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana – MJP-JAY) :
ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची आरोग्यविषयक योजना आहे, जी राज्यातील गरीब व गरजू नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण उपचार प्रदान करते.
योजनेचा उद्देश :
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना गंभीर आजारांवर मोफत व त्वरित उपचार सुविधा उपलब्ध करून देणे. खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना कैशलेस (Cashless) उपचार उपलब्ध करून देणे. रुग्णालयीन खर्चामुळे गरीब नागरिकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळणे. आरोग्य सेवांमध्ये समानता साधणे.
योजना कोणासाठी :
महाराष्ट्रातील रहिवासी असलेले खालील लाभार्थी पात्र आहेत.
1) अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Anna Yojana) कार्डधारक
2) अन्न सुरक्षा योजनेतील (Food Security Card) लाभार्थी
3) पिवळे/केशरी/शिधापत्रिका (Ration Card) असलेले BPL कुटुंब
4) SECC-2011 यादीत नाव असलेले कुटुंब
5) माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी
6) पत्रिका असलेले नागरीक ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांपर्यंत आहे (ग्रामिण भागात) आणि 2 लाखांपर्यंत (शहरी भागात)
उपलब्ध सेवा / लाभ :
1000 पेक्षा अधिक प्रकारच्या शस्त्रक्रिया, उपचार व तपासण्यांचा समावेश. मोफत औषधे, शस्त्रक्रिया, हॉस्पिटलमध्ये राहण्याचा खर्च व तपासण्या
विशेषत : हृदयविकार, कॅन्सर, मूत्रपिंडविकार, मेंदू विकार, इ. गंभीर आजारांवर उपचार
शासकीय व खासगी (empanelled) रुग्णालयांमध्ये उपचार शक्य
कागदपत्रांची यादी (Documents Required) :
1) आधार कार्ड
2) शिधापत्रिका (Ration Card)
नोंदणी प्रक्रिया : कोणतीही पूर्व नोंदणी आवश्यक नाही. कार्डधारक थेट योजनेच्या संबद्ध (empanelled) रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकतात. आरोग्य मित्र रुग्णालयात मार्गदर्शन करतो.












